गोष्टी लेखकांच्या. भाग १- गुलजार

सर्वात आधी स्क्रिप्टरायटर म्हणजे काय? काय असणार आहे या लेखमालिकेत याची माहिती देते. स्क्रिप्टरायटर म्हणजे एखादी कथा, सिनेमाची कथा लिहिणारी व्यक्ती. ही लेखमालिका अशा व्यक्तींवर असणार आहे. आपण बॉलिवुड आणि मराठी सिनेजगतातल्या उत्तम स्क्रिप्टरायटर्स विषयी बोलणार, लिहिणार, वाचणार आहोत. या स्क्रिप्टरायटर्सचं करिअर, माईलस्टोन प्रोजेक्ट्स, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्याचा जगाला माहीत असणारा स्वभाव, त्यांच्या आयुष्यातील काही खुमासदार किस्से हे सगळ तुम्हाला या लेखमालिकेतून वाचायला मिळेल.अर्थात हे सगळं तुम्हाला गुगलवर मिळूच शकत पण या स्क्रिप्टरायटर्स च्या आयुष्यातील अनुत्तरित राहिलेले प्रश्न,समोर न आलेले कंगोरे, न उलगडलेली कोडी आणि थोडे हटके खुस खुशीत किस्से  असं काहीसं इथे लिहिण्याचा माझा प्रयत्न असेल.

आज या लेखमालिकातील पहिलं पुष्प आहे गुलजार.नक्की वाचा आणि आपला अभिप्राय कळवा.

गुलजार यांच्यापासून या लेखमालिकेची सुरुवात करणं म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. आता शिवधनुष्य मी नीट पेललं की नाही हे हा लेख वाचून वाचकच ठरवू शकतील. तर संपूरन सिंग कालरा यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 चा. काय म्हणताय?? हे कोण? तर हेच आपले गुलजार. संपूरन सिंग कालरा हे गुलजार यांचं खर नाव.

गुलजार यांचा जन्म झेलम जिल्ह्यात (जे आता पाकिस्तानमध्ये आहे)शीख कुटुंबात झाला. भारत पाकिस्तान फाळणी काळात गुलजार यांच्या कुटुंबाची देखील फाळणी झाली आणि.गुलजार यांना आपल शिक्षण अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं. पोटापाण्याचा मोठा प्रश्न समोर आ वासून उभा होता त्यामुळे गॅरेज, पेंटर अशी अनेक कामं करत त्यांनी आपल्या परीने प्रश्नांना तोंड दिले. गुलजार यांच्याच भाषेत त्यांच्या त्यावेळच्या आयुष्याचं असं काहीसं वर्णन करता येईल ” थोडा हैं, थोडे की जरुरत है.जिंदगी फिर भी यहा खुबसुरत हैं”

त्यांना शिक्षणाची साथ सोडावी लागल्याने पुन्हा त्या वाटेला जाण्याचा प्रश्न नव्हता पण डोक्यात विविध कल्पना असायच्या, त्यावर त्यांना जे सुचायच ते लिहून काढण्याची आवड होती , त्यांना कविता सूचायच्या, त्यांची रंगाशी दोस्ती होती.इथूनच खरे ‘ गुलजार ‘ जन्म घेऊ पहात होते. त्यांनी पूर्णवेळ लेखक म्हणून काम करायला त्यांच्या वडलांचा विरोध होता पण नंतर त्यांच्या विरोधाची धार बोथट होत गेली. गुलजार कळत्या वयात येईपर्यंत मुंबई त्यांच्या सरावाची बनली होती.

त्यांनी बिमल रॉय आणि हृषिकेश मुखर्जी यांच्या सोबत आपल्या लिरीसिस्ट करिअरची सुरुवात केली.सुरुवातीच्या फिल्म्समध्ये त्यांनी लिहिलेले डायलॉग, गाणी हे फारसे गाजले नाहीत पण आपणा सर्वांच्या आवडीच ‘ हम को मन की शक्ति देना ‘ हे गाणं गुलजार यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातच लिहिलं होत. नंतर मात्र त्यांच्या करिअरने वेग घेतला. मग 1971 साली  प्रदर्शित झालेला मेरे अपने सिनेमा असो, 1975 साली प्रदर्शित झालेला मौसम असो ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे  माचिस,ओमकारा, कमीने, दिल से, स्लमडॉग मिलेनिअर पर्यंत त्यांनी लिहिलेली गाणी, त्यांनी लिहिलेले डायलॉग गाजले आहेत. लिरीसिस्ट सोबतच दिग्दर्शनाकडेही त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि तिथेही कारकीर्द गाजवली. त्यांचा ह्या सगळ्या प्रवासाचा आलेख चढताच होता अस नाही तर पुष्कळ वेळा त्यांनी अपयशाचा सामना केला , त्यामुळे येणाऱ्या निराशेचा सामना केला आणि प्रयत्नपूर्वक यश पदरात पडलं.

ऐसा तो कभी हूआ नहीं, गले लगे और छुआ नहीं

असच आहे गुलजार आणि त्यांच्या शब्दांच.गुलजार म्हंटल की आठवतात त्यांचे शब्द, त्यांच्या गझल, त्यांनी लिहिलेले शेर, शायरी. एकेक शब्दातून त्यांचा अंदाज कळतो. कधी ते आयुष्यालाकडे गंभीर पणे बघतात ,कधी आयुष्यालाच हसत खेळत विचारतात-

इतना क्यू सिखाये जा रही हो जिंदगी, हम कौन सी सदिया गुजारनी हैं यहा.

गुलजार यांनी मुख्य करून उर्दू आणि पंजाबी या दोन भाषांमध्ये कविता लिहिल्या. त्यांच्या बऱ्याच कविता आणि त्यांनी लिहिलेल्या कथा प्रकाशितदेखील आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी काही दूरदर्शन मालिकांसाठी लिखाणकाम केलं. तर शेरो शायरी, कथा, कविता, गाणी, दिग्दर्शन या क्षेत्रात भराऱ्या मारणाऱ्या माणसाचं वैयक्तिक, वैवाहिक आयुष्य कस होत??

कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल एकेकाळची सुप्रसिद्ध अभिनेत्री राखी यांच्याशी गुलजार यांचा विवाह झाला होता. दोघांमध्ये तब्बल पंधरा वर्षांच अंतर. विवाहाविषयी ‘ झाला होता ‘ हे शब्द याकरिता कारण नंतर काही कारणामुळे ते विभक्त झाले पण विभक्त म्हणजे विभक्त नव्हे म्हणजे असं की त्यांनी त्यांच्या मुलीसाठी विभक्त न होता तिला वाढवायचा निर्णय घेतला. अर्थात त्यांचं एकमेकांशी नवरा बायको म्हणून पटत नाही हे जगजाहीर असल तरी त्यांच्यातली मैत्री अजूनही तितकीच घट्ट होती/आहे. गुलजार एका इंटरव्ह्यू मध्ये गमतीत म्हणाले होते-

” आजही मला राखीच्या हातचा मासा खायची हुक्की आली तर मी लाच म्हणून राखीला साडी देतो. हे मी आमच्या लग्नापूर्वीच्या दिवसांपासून करतो आहे. तिच्यामुळे मला साड्यांचे बरेच प्रकार समजले आणि आजही मी तिला बेस्ट साडी.गिफ्ट म्हणून देतो.”

गुलजार आणि राखी यांना मेघना नावाची मुलगी आहे, जी स्वतः फिल्म मेकर, लेखिका आहे. गुलजार यांना त्यांची मुलगी प्रिय होती/आहे पण त्यांच्या नवरा बायकोच्या नात्यातल्या दरीमुळे मुलीने बरच सहन केल्याची त्यांना खंत वाटते. गुलजार आणि राखी यांचं नातं त्यांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास असं सांगता येईल-

आप के बाद हर घडी हम ने

आप के साथ ही गुजारी हैं

किंवा

हम ने अकसर तुम्हारी राहो मे रुक कर

अपनाही इंतजार किया है

खूप कल्पक आणि सर्जनशील असणाऱ्या लोकांना दुःखाचा , अपेक्षा भंगाचा उशा:प असतो असं.म्हणतात. हे गुलजार यांच्या बाबतीत खूप खरं भासत. खडतर बालपण, कष्टाचं तरुणपण, नंतर करिअर मध्ये मिळालेली प्रसिध्दी, नंतर झालेला विवाह त्यात आलेल्या अडचणी, त्या अडचणींवर केलेली मात आणि आता आयुष्याचा उत्तरायण. हल्ली गुलजार प्रसिध्दी माध्यमांकडून खूप दूर असतात. ते म्हणतात-

“my songs are not angry or bitter because I am not bitter. I am hopeful as an artist.”

त्यांची ही वाक्यं खरी असल्याचं जाणवत कारण नात्यातील केवळ कडवटपणा त्यांच्या लक्षात राहिला असता तर त्यांची आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या बायकोची इतकी मैत्री नसती. त्यांचं पाकिस्तानविषयी , आपल्या जन्म भूमिविषयी वाटणार प्रेम अबाधित राहिलं नसत. त्यांच्यातला साधेपणा तासच जिवंत राहिला नसता.

कधी कधी वाटतं मागचं सगळ विसरून आयुष्याच्या सांजसंध्येला ते आयुष्याशी मैत्री करू पाहत असावेत पण आता आयुष्य एक पाऊल मागे घेऊन आपला इगो बाजूला ठेवून त्यांच्याशी मैत्रीचं नातं जोडायला मनापासून तयार नसाव अशा वेळी गुलजार म्हणात असतील-

लगता हैं जिंदगी आज कुछ खफा हैं

चलिये छोडिये

कौन सी पहली दफा हैं

© भाग्यश्री भोसेकर- बीडकर

Image by Free-Photos from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

4 thoughts on “गोष्टी लेखकांच्या. भाग १- गुलजार

  • July 26, 2019 at 12:16 pm
    Permalink

    छान माहिती, उत्कंठा वाढवणारी लेखन शैली.
    विषय मोठा आहे, आणखी लांबी वाढवता आली असती तर वाचण्यात आणखी मजा आली असती.
    पण स्तुत्य उपक्रम

    Reply
    • September 17, 2019 at 3:29 am
      Permalink

      आपल्या प्रतिक्रयेसाठी आभार…लेखाची लांबी वा ढविण्याचा प्रयत्न नक्की करेन

      Reply
  • July 31, 2019 at 7:05 pm
    Permalink

    Khup Chan likhan …vachtana khup bhari vatal ATA pudhchya lekhachi vat pahatey

    Reply
    • September 17, 2019 at 3:30 am
      Permalink

      खूप खूप आभार…पुढचे लेखदेखील नक्की वाचा

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!