पत्र क्रमांक 4

प्रिय मी,

तर मागचा आठवडा बराच धामधुमीचा होता. बंगलोरच्या जॉबचा धक्का ओसरायला थोडा वेळ लागला आणि हळूहळू मी बंगलोरकडे प्रस्थान ठेवण्याची तयारी करायला घेतली. बघता  बघता फ्लाईट बुकही झालं आणि निघण्याचा दिवस उजाडला.

डॉ. आदित्य आणि डॉ शहा दोघांना मी काल बाय म्हणायला गेले हिते. पहिल्यांदा डॉ. आदित्य  यांच्या डोळ्यात चमकणारा होकार पाहिला ..ते मला जेव्हा ‘ऑल द बेस्ट’ म्हणत होते तेव्हा उगाचच मला वाटलं की त्यांना यापुढेही जाऊन अजुन काहीतरी बोलायचंय..(मीही मनकवडी वागायला लागले की काय त्यांच्यासारखी!!!) असो पण ते नेहमीप्रमाणे माफक हसत..मोजूनमापून बोलले..डॉ. शहा नेहमीसारख्या दिलखुलास हसल्या , मोकळ्या बोलल्या ..त्यांच्या शुभेच्छा गरजेच्या होत्याच.

एअरपोर्टवर सोडायला आई, बाबा, गौतम, आजी आले होतेच शिवाय रशम्या आणि अमेय पण आले होते.

“गार, मेरे शेर..जा जिले अपनी जिंदगी” या रशम्याच्या शुभेच्छा

तर आमचे मित्रवर्य अमेय हे हिमनगासारखे आहेत. वरती फक्त टोक दिसत बाकी मनाच्या तळागाळात काय काय लपलय हे खुद्द अमेय पंडित यांनाच माहीत. असो तर अमेयने घट्ट मिठी मारली..स्पर्शच सांगून गेला सगळं..अमेयने जेमतेम एक वाक्य उच्चारल

“काळजी घे”

मी सर्वांचा निरोप घेऊन , आईबाबांना मनोसोक्त बिलगून निघाले. आजीचा आशीर्वाद घेतला. गौतमशी झोंबाझोंबी केली..बरं वाटलं

सिक्युरिटी चेकिन करून मी फ्लाईट बोर्ड करण्याची वाट पहात बसले. आज सकाळपासून जो विचार मनात कैकदा येऊन गेला, त्या विचाराने पुन्हा डोकं बाहेर काढलं. काय करू? करू का मेसेज?
मी फोनबुक मधून मिहिरच नाव शोधलं. अजूनही हा माझ्या फोनबुकमध्ये आहे!!! असो मी मेसेज टाईप केला

“Good bye Mihir & have a great life..I don’t need your wishes in return as I am already having great one”

आणि मी मिहिरला ब्लॉक केलं….कायमचं…कदाचित मनातूनही ब्लॉक केलं..कदाचित याकरिता की आत्ता आत्तापर्यंत आम्ही रिलेशनमध्ये होतो..निदान माझ्यासाठी मूव्ह ऑन करणं सोप्प नव्हतं …डोळे मिटून शांतपणे मागे टेकून बसले. इतक्यात बोर्डिंग सुरूझालं. थोड्याच वेळात माझ्या फ्लाईटने टेकऑफ घेतला आणि मी मनात म्हंटल

“Bangalore, here I come”

तुझीच,
गार्गी

Image by Ralf Kunze from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!