40thBDAY… 3
आधीच्या भागाची लिंक- 40TH BDAY…2
पहाटे अचानक जाग आली राही ला… आणि पाणी पिण्यासाठी तिनं बाजूच्या जार मधलं पाणी ग्लासात ओतून घेतलं.. काही मिनिटं ती तशीच बसून राहिली… आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला ..
एक ऑडिओ msg…
राही…
Wish you a very happy 40th Birth day..
Pls तुझ्या टेरेस वर येशील…?
राही ला कळेचना… ह्या व्यक्तीला कसं कळलं मी जागी झालीये..?
कोण लक्ष ठेवतंय आपल्यावर??
आणि हा आवाज..??? ओळखू येतं नाहीये?
तिनं बाजूच्या नाईटीचा long gaun घातला..
केस वर बांधले..
आणि डोळ्यांवर पाणी मारून ती टेरेस वर आली…
पुन्हा एक ऑडिओ msg…
Hi sweetipie…
एक गिफ्ट पाठवलयं.. बघ…
♥️ शेप च्या फुग्यांचा एक बंच अलगद वर आला .. त्याच्या टोकाशी एक बॉक्स होता… तिनं तें गिफ्ट त्या फुग्यांपासून विलग केलं.. आणि तें बलून्स हवेत उडाले… इतक्या पहाटे… लाल रंगाचे असंख्य बलून्स तुमच्या टेरेस वर उडताना पाहणं… अहा.. किती हि मोठे झालात तरी हा आनंद वेगळाच …
तिनं गिफ्ट उघडलं…
आणि आश्चर्यानं तिनं आ sss वासला…
Guess काय असेल??.
💍 रिंग… ना ना ना ना….
त्यात होतं… एक पेंडंट..(फोटो बघा 😜😜 कळेलचं )
सगळ्यांची फँटसि… येस्स्स्सस .. टायटॅनिक वालं पेंडंट…
तिनं तें घालून पाहिलं आणि ती आत आली आरशात पहायला…
Wow… so cute…
असा उदगार बाहेर पडतो नं पडतो तोच…
डोअर बेल वाजली…
आत्ता एवढ्या सकाळी.. 🤔कोण?
तिनं दारं उघडलं.. newspaper…
ओह्ह.. आपण जरा जास्तच अपेक्षा केल्या… असं म्हणत दारं लावलं.. आणि ती कॉफ़ी बनवून घ्यायला किचनकडे वळली..
तिथे… कॉफ़ी तयार होती ती हि तिच्या आवडत्या कुकीज सोबत.. त्यावर एक चिट..
Hii bday girl.. just make me hot as you are
😍😍♥️😘😘
पुन्हा एकदा डोअरबेल… पण यावेळी.. तिला आवडणारी मोगरा सोनचाफा आणि बकुळ या फुलांची परडी होती.. आणि दारात उभी होती मिता…
मितु..
काय गं कसलं गोड़ सरप्राइज दिलंस… म्हणत तिला मिठी मारली..
मितु नीं अजून एक सुखद धक्का दिला..
चला तुला आवडतो तसा ब्रेकफास्ट करून देते…
आणि मग….
मग काय??
अभ्यंग स्नान…
काय???
हॊ अगं.. काकू गेल्यापासून तुला आणि मला अशी लडिवाळ भेट मिळालीये कुठे??
माझी आई लहानपणीच गेली… शेजारची सख्खी बालमैत्रीण तूच .
आजी मी आणि बाबा या जगात… तु आणि काका काकू हि आलात..
मग एक दिवस रविवारी तुला तुझ्या आईनं लावलेलं उटणं शिकेकाई पाहिली…
तुझी मस्त चम्पी पाहिली.. आणि माझ्या डोळ्यातलं तें निरागस बाल्य हरखून गेलं… असूया नव्हतीच कधी पण आस होती ..
ती काकूंनी जाणली आणि त्याचं दिवशी त्या आजीची परवानगी मागायला आल्या…
मिताला मी न्हाऊ माखु घालते… तिचे हि हे काळेभोर केस उगा मुलांसारखें कापू नका.. पोरीला माझ्या पोरी सारखीच जपेन ..
आजी हि खुष झाली… हसत हसत परवानगी दिली . तिच्या तब्येती मुळे माझ्यावर लक्ष ठेवणे आणि बाई कडून कामं करून घेणे हेच मुश्किलीने जमत होतं ..
आज मला त्याच गोष्टीची आठवण झाली… आणि म्हणून हे सरप्राईज.. तुला ..
राही ला गेल्या दहा वर्षातले सगळे सण आठवले…
दिवाळी ला हमखास वाटायचं तिला .. पण पलाश ला म्हणे उटण्याचा वासच आवडायचा नाही… शिकेकाई एकदाच लावली तर डाऊन मार्केट म्हणाला होता तो ..
काही खपल्या निघाल्या की आपसूक डोळे पाणावतात ..
आज ह्या तिच्या सगळ्यात जुन्या फॅन्टसीला मितु पूर्ण करणार होती…
नाश्ता करून ती समोर बसली …
उटणं, कोमट दूध, साय आणि गुलाबपाणी…
ह्याचा लेप लावून घेतला…
केसाला रिठा शिकेकाई लावली .
मग तिच्या मोठ्या बाथटब मधे गुलाबाच्या पाकळ्या अत्तर घालून तो सजवला…
बाजूला छोट्या छोट्या मातीच्या पणत्या उजळल्या आणि तें घर आज दिवाळी पहाटेच्या सुगंधात न्हाऊन निघालं …
मग बाहेर येऊन ती काहीवेळ तशीच बाथरोब गुंडाळून पडून राहिली… त्या पॉवर नॅप नीं ती आता टवटवीत झाली ..
जाग आली तेव्हा मितु तिच्या केसांना धुपा नीं शेक देतं होती…
तिनं मितूच्या मांडीवर डोकं ठेवलं.. आणि तिचा हात गालावर धरून ठेवला ..
अश्या ओल्या केसांची राही कुणाच्या तरी काळजाचा ठोका चुकवत होती ..
##ह्या पुढच्या प्लॅन साठी थोडी वाट पाहावी लागेल .. btw गिफ्ट कुणी दिलं हे कळलंच असेल ना .
##स्पर्शतृष्णा हि केवळ त्या दोघांमधली असते असं नसतं…
ती असते मायेच्या स्पर्शाची .. त्या स्पर्शाला कळते ती आत्मीयता ..
एखादा दिवस असा जगायला मिळाला तर??
##तुमच्या अशा काही हटके इच्छा असतील तर सांगा कॉमेंट मधे .. 🤭😜..
क्रमश:
©®मनस्वी
पुढील भागाची लिंक- 40thbday…4
Image by 3D Animation Production Company from Pixabay
- नैना ठग लेंगे…९ - November 19, 2021
- नैना ठग लेंगे…८ - November 18, 2021
- नैना ठग लेंगे..७ - October 19, 2021
Pingback: 40thbday…4 – LekhakOnline – Excellent Marathi Articles