गोष्टी लेखकांच्या. भाग 2- विशाल भारद्वाज

माचिसमधलं छोड आये हम वो गलिया किंवा छप्पा छप्पा हे गाणं आठवतंय?? किवा सत्यामधलं सपने मे मिलती हैं हे गाणं आठवतंय?की चाची 420 मधील चुपडी चाची हे मजेदार गाणं आठवतंय?? या सगळ्या गाण्यांच संयोजन केलं आहे विशाल भारद्वाज यांनी. विशाल भारद्वाज तसा लेखक कमी पण दिग्दर्शक, संगीत संयोजक जास्त.तुम्ही म्हणाल ही लेखमालिका तर स्क्रिप्ट रायटर्स विषयी आहे एखादा माणूस दिग्दर्शक जास्त आणि लेखक कमी असेल तर त्याच्याविषयी का लिहिताय?!!
ज्या माणसाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या फिल्म्स लिहिल्या पण त्यातल्या बऱ्याचशा परीक्षकांनी नावाजल्या अशा माणसावर लिहायला हवं नाही का?
चंदपुर या बिहार मधल्या छोट्याश्या गावात 1965 साली एक मुलगा जन्माला येतो, आई गृहिणी, वडिलांची साधीशी नोकरी पण वडिलांना हिंदी कविता लिहिण्याची, हिंदी फिल्म्स बघण्याची खूप आवड.विशाल यांना लहानपणी क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्यांना क्रिकेटर (भारतात अनेक मुलांच्या स्वप्नां पैकी एक स्वप्न)बनायचं होत, या कारणासाठी त्यांचं कुटुंब चंदपुरहून मेरठला शिफ्ट झालं. जिथे विशाल यांनी अंडर 19 क्रिकेट खेळले. पण एका प्रॅक्टिस सेशनच्या वेळी त्यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाल्याने ते क्रिकेट पुढे खेळू शकले नाहीत. मग पुढे त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं लिहिलं, हे गाणं ऐकलं आणि त्यांच्या वडलांना असं वाटलं की आपल्या मुलाने संगीतात करिअर करावं. यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाच्या गाण्याविषयी त्या काळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांच्याशी चर्चा केली आणि उषा खन्ना यांनी विशाल यांना फिल्म यार कसम यामध्ये संधी दिली. कॉलेजमध्ये असताना कॉलेज संपल्यानंतर विशाल यांनी संगीताच्या क्षेत्रात हातपाय मारायला सुरुवात केली.
1995 साली लहान मुलांची फिल्म अभय या फिल्म मधून त्यांनी संगीत संयोजक म्हणून पदार्पण केलं.त्यानंतर फौजी, संशोधन या फिल्म्स साठी त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी संगीतबद्ध केलेल्या माचिस, सत्या, हु तू तू, चाचि 420 या सगळ्या फिल्म्स खूप गाजल्या.  त्यानंतर मकडी व इतर काही फिल्मसाठी त्यांनी दिग्दर्शनही केलं व त्यातही यश मिळवलं.
आता प्रश्न पडतो या सगळ्यात फिल्म्सचे लिखाण कुठे आहे? तोच तर मुख्य मुद्दा आहे या लेखाचा आणि
त्याकडे वळूयातच. तुम्ही मकबूल नावाचा सिनेमा पाहिला आहे??विशाल यांचा स्क्रिप्ट रायटर म्हणून हा सिनेमा म्हणजे पहिलं यश होत. मकबूल या सिनेमाची स्टोरी खूप जगावेगळी होती अशातला भाग नाही पण ती ज्या पद्धतीने मांडली गेली होती तो प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता. Underworld चा Don आणि  त्याचा सहकारी. सहकारी डॉनच्या पत्नीच्या प्रेमात पडतो आणि डॉनच्या पत्नीच्या मदतीने डॉनचा खून करून स्वतः डॉन बनतो.  यानंतर गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा ओंकारा पाहिला आहे तुम्ही? ओंकारा हा सिनेमा मूळ शेक्सपिअर याने लिहिलेल्या ऑथेल्लो या सिनेमाचं हिंदी व्हर्शन आहे. मुळात असा सिनेमा हिंदी मध्ये बनू शकतो ही कल्पनाच अफलातून आहे आणि ती यशस्वीरित्या पूर्ण करून दाखविली विशाल यांनी. ओंकाराची कैरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला निवड झाली. यानंतर शाहीद कपूर आणि प्रियंका चोप्रा यांच्यावर चित्रित केल्या गेलेल्या कमीनेने देखील अनेक परिक्षकांची वाहवा मिळवली.
विशाल यांनी लिहिलेल्या या सिनेमाना यश मिळाल तरी काही चित्रपटांनी अपयशाची चव देखील चाखली. मग तो सात खून माफ असेल,  मटरू की बिजली का मंडोला असेल किव नुकताच आलेला आणि अापटलेला
पटाखा असेल.
विशाल यांनी काही ऑफबीट चित्रपटांचं लेखन केलं त्यात मकबूल आहे, the blue umbrella
आहे, ओंकारा, इश्किया, देढ इश्किया आहे. रंगून आहे, हैदर आहे. हैदर तर समीक्षकांना प्रचंड आवडलेली फिल्म आहे. हैदर ही मूळची शेक्सपिअर लिखित हॅम्लेट या नाटकावर आधारित असलेली फिल्म. मूळ विषय आणि कथानक एखाद्या इंग्रजी नाटकावर आधारलेलं त्यामुळे यात नवीन काय ? आणि याची मूळ प्रवृत्त्ती टिकवून नवीन काय करता येईल ? ते स्वीकारलं जाईल का? असे अनेक प्रश्न विशाल यांनी त्यांच्या चित्रपटांना मिळालेल्या पुरस्कारामधून  सोडवून दाखवले.
कामाच्या बाबतीत गंभीर असलेले विशाल प्रत्यक्ष आयुष्यात हसत खेळत जगणारे व्यक्ती आहेत. आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल ते म्हणजे त्यांच्या पत्नी एक प्रसिद्ध गायिका आहेत, त्यांचं नाव आहे रेखा भारद्वाज. विशाल हे आयुष्यातल्या यशाकडे व अपयशाकडे सारख्याच नजरेने बघतात. म्हणूनच की काय रंगून हा चित्रपट चांगली कहाणी असूनही का आपटला याचं ते विश्लेषण करू शकतात.जिथे मकबूल अनेक परीक्षकांनी नावाजला तिथेही आपण कुठे सुधारणा करू शकतो यावर विशाल विचार करतात. ते एका मुलाखतीत म्हणतात
“मी जेव्हा फिल्मने बॉक्स ऑफिसवर किती यश मिळवलं असा विचार करतो तेव्हा लक्षात येत की हे नंबर्स कोण लक्षात ठेवत यापेक्षा सुजाण प्रेक्षक कामात किती सच्चाई होती हे लक्षात ठेवतो आणि मला अशा लोकांसाठी काम करायला आवडत नि आवडेल “
त्यांची पत्नी रेखा त्यांच्याविषयी बोलताना कॉलेजच्या दिवसांत त्यांच्या होणाऱ्या भेटीची आठवण करत म्हणते
“मी त्याला तो संगीत क्षेत्रात असल्यापासून ओळखते. त्याला संगीताची उत्तम जाण आहे, संगीत हाच आमच्या भेटी तला दुवा ठरला. कविता ही त्याची स्ट्रेंथ आहे. आम्ही एकत्र खूप चढउतार पाहिले पण अप यशाकडे तो एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून खूप छान पाहतो आणि म्हणूनच तो या क्षेत्रात अजूनही जमिनीवर पाय रोवून उभा आहे”
क्रिकेटर होण्याची स्वप्न पाहणारा मुलगा संगीत संयोजक बनतो, नंतर दिग्दर्शन करतो पुढे सिनेमे लिहितो. आपल्यातल्या सामान्य प्रेक्षक ते परीक्षक या सर्वांना खिळवून ठेवेल अशा कथा लिहितो अशा वेळी त्याचे सर्व सिनेमे हैदर मधील एक डायलॉग म्हणत असावेत असं वाटतं
दिल की अगर सूनु तो हैं
दिमाग की तो हैं नही
जान लू के जान दु
मै रहू के मै नही
Image by Free-Photos from Pixabay 
Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

2 thoughts on “गोष्टी लेखकांच्या. भाग 2- विशाल भारद्वाज

Leave a Reply to minal Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!