एका लग्नाची गोष्ट….

तो आवडायचा तिला.
दिलसे.
त्याची जिम्मी बाॅडी.
लोणी काळभोर ऊडते केस.
त्याचं खळाळून हसणं.
त्सुनामीसारखं.
त्याच्या गालावरची कोपरखळी.
त्याचं ट्रेकींग.
त्याचं कॅरी आॅन करिअर.
एक पाय पुण्यात एक पाय यूएसमध्ये.
सारखं तळ्यात मळ्यात करणं.
काय पाहिलंस माझ्यात ?
तिच्याकडे ऊत्तरच नव्हतं.
तीही आवडायची त्याला.
तिला बघितलं की गुदगुल्या व्हायच्या.
तिचे कुरळे केस.
ती हसली की हिर्यामोत्यांचा पाऊस.
केअरींग नेचर.
नाहीतर हू केअर्सवाला अॅटीट्यूड.
तिच्या फिल्डमधलं तिचं डेडिकेशन.
तिचं ते घड्याळ विसरणं.
तिचं जवळ असणं.
तिचं दिसणं…
खुदकन् हसणं.
दिल तो पागल है !
तो वेडा तिच्यासाठी.
आणि ती  ?
ती सुद्धा फूल टू पागल.
मग प्राॅब्लेम काय आहे ?
ती दोघं एकाच शाळेत.
एकाच काॅलेजात.
एकमेकांना चांगलं ओळखून आहेत.
दोन्ही घरांचा घरोबा.
तिकडून काहीच प्राॅब्लेम नाही.
बचपन के प्यारवाली लवस्टोरी ?
तसलं काही नाही बुवा.
अब तक…
एक दूसरोंको वो नजरसे देखाही नही था कभी.
प्रेमसागरात आत्ता बुडाले.
दिल की बात जुबाँपर नही आती ?
छे ! छे !
तशी दोघं निर्लज्ज आहेत.
दहा वेळा प्रोपोज करतील एकमेकांना.
अरे मग लवस्टोरी आहे की डेलीसोप ?
ऊगा पाणी घालून टीआरपी का वाढवताय ?
गुँज ऊठी शहनाई.
लावा लग्न आणि संपवून टाका लवस्टोरी.
तोच तर प्राॅब्लेम आहे.
डर लगता है !
दिसतं तसं नसतं.
गोडावून आणि शोकेसमध्ये फरक असतो राव.
दीड दोन तास बागेत,
झाडांभोवती घिरट्या घालत,
लवसाँगवाली ड्युएट गाणं…
अन् चोवीस तास एकमेकांना सहन करणं…
यात फरक असतो.
फूल और काँटे.
प्रेमाचे गुलाब सुकले की काटे बोचायला लागतात.
मनपसंत.
दिल चाहता है !
मेड फाॅर ईच आदर.
आज ठीकेय.
ऊद्या दोघांचं नाही पटलं तर ?
प्रेमाला एक्स्पायरी डेट असते का हो ?
पसंत नाही पडल्यास परत..
लग्नाच्या प्रेमाला रिटर्न पाॅलीसी नसते.
दोघं हुश्शार.
जरा जास्तीच.
ट्राय ट्राय बट डोन्ट क्राय.
सहा महिने.
ट्राय करू.
जमलं तर…
वाजवा रे वाजवा.
नाहीतर ?
तू तेरे रास्ते मैं मेरे.
सो सिम्पल.
ठरलं तर..
सहा महिने.
लिव्ह ईन.
लव्ह ईन.
कशाला ऊद्याची बात ?
प्यारवाली लवस्टोरी .
प्रेमासाठी लग्न कशाला करायला हवं ?
लग्नाशिवाय ?
एकत्र रहायचं ?
आणि तसलं काही झालं तर ?
होऊ दे की. .
ईटस् बिट नॅचरल.
ते घेतील काळजी.
हल्लकल्लोळ.
दोन्ही घरचे बाप पेटलेले.
आयांची रडारड.
ते दोघं कूल.
त्याची आजी.
नव्वदीची.
“आगे बढो.
हम तुम्हारे साथ है !”
आजीचा आशिर्वाद.
यूँही कट जायेगा सफर…
साथ चलनेसे.
बघता बघता.
सहा महिने संपूनही गेले..
ऊभं आयुष्य जगले दोघं.
पहिल्या पहिल्यांदा..
स्वतःचा ईगो कुरवाळणं.
स्पेस देणं.
हळूहळू एकमेकात गुंतून जाणं.
भांडाभांडी.
वादावादी.
थोडीशी मारामारी सुद्धा.
फिर भी…
एकमेकांची जाम सवय झालेली.
मधे चार दिवस तो यूएसला.
तिला घर खायला ऊठलेलं.
सख्ख्या बायकोसारखे तिने केलेले दहा फोनकाॅल्स.
तिच्या बर्थडेचं दोघांनीच केलेलं सेलीब्रेशन.
त्यानं दिलेलं सरप्राईज गिफ्ट.
सहा महिन्यात प्रेमाचं कम्पाऊंड ईन्टरेस्ट जाम वाढलेलं.
पटलं.
जानम समझा करो.
यही है राईट चाॅईस बेबी..
सहा महिने संपून दोन महिने वर.
ठरलंय.
सनई चौघडा.
लग्नाला नक्की यायचं हं.
आठवड्यावर लग्न आलंय.
आज खास पार्टी.
तो ती आणि ती.
दुसरी ती कोण ?
बस क्या ?
गेस…
तिसरी आजी…
आजी.
आजीच्या एका गालाचा पापा घेताना तो.
दुसर्या गालाचा पापा घेताना ती.
मस्त सेल्फी आलाय.
जुम्मा चुम्मा दे दे.
तो आजीला हळूच विचारतो.
“आज्जो तू कशी तयार झालीस ?”
‘मला माहिती होतं..
हे अस्संच होणार.
एरवी मी कधीच ऐकलं नसतं.
पण तुमच्या प्रेमाची गोष्ट वेगळी होती.
तुमचं प्रेम,
तुमच्या दोघांच्या डोळ्यात दिसलं मला.
तुम्हाला कन्फर्मेशन लेटर हवं होतं.
तुम्हाला सहा महिने लागले.
मला तेव्हाच कळलेलं.
लव्ह बिफोर मॅरेज असो ,
नाहीतर मॅरेज आफ्टर लव्ह.
प्रेम हे प्रेमच असतं.
तुमचं आमचं सेम असतं.
खरं तर, तुमचे आजोबा,
सहा महिने असे मिळाले असते तर..’
आजीचा शरमा के मोतीचूर लड्डू.
तेवढ्यात आजी एकदम मधनं गायब.
“आता मी कशाला पाहिजे मधे ?”
दोघं…..
आजीनं डोळा मिचकावला.
आजी तिच्या कानाशी.
‘ सहा महिने फक्त प्रेमच केलंत की ??’
‘बाकी कशाची गरजच पडली नाही’
ती आपोआप लाजली.
त्याची नजर…
तिच्या डोळ्यांशी लपाछपी खेळू लागली.
बॅग्राऊंडला..
‘ कुठं कुठं जायाचं हनीमूनला ?’
 ऐकू येवू लागलं.
लिव्ह ईन लव्ह ईन झालेलं.
जुग जुग जियो..
ट्राय अॅट युवर ओन रिस्क.
Image by StockSnap from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

3 thoughts on “एका लग्नाची गोष्ट….

Leave a Reply to Bhakti_P@80 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!