सोलो_ट्रिप – भाग १ – पूजा पाठक

अनया ची बॅग भरायची घाई सुरु होती आणि एकीकडे तिच्या आई ची बडबड सुरु होती. “असले नसते उद्योग बरे सुचतात ग तुला? म्हणे बाबांना विचारलं होता. तुझे बाबा म्हणजे .. एक मी आहे म्हणून केलाय संसार नाहीतर एखादी पळून गेली असती कंटाळून नाहीतर वेडी झाली असती तुम्हा बाप लेकिच्या नादात. “सोलो ट्रिप” म्हणे. जग काय चांगलं आहे का? नसत्या उठाठेवी हव्यात कशाला? नोकरी करायला लागली तर शिंगच फुटली हिला.. ” आईची अखंड बडबड सुरु होती. अनया आणि तिच्या बाबांना हे अपेक्षित असल्याने ते सोयीस्कर पणे दुर्लक्ष करत होते.

अनया .. २२ वर्षांची तरुणी. गोरीपान, कुरळे केस, सुंदर डोळे, नाजूक जिवणी आणि उंच.. अभ्यास आणि इतर सर्वच गोष्टींमध्ये हुशार. उत्साहाचा अखंड झराच जणू.. सगळ्याच धाडसी गोष्टी करण्यात पुढे.. बाईक चालवणे, साप पकडणे, वगैरे वगैरे.. नुकतीच तिला कॅम्पस मधून नोकरी मिळाली होती, आणि तिने कमावलेल्या पैशांतून तिने स्वतः साठी व्हिएतनाम ची सोलो ट्रिप प्लॅन केली होती! हि गोष्ट तिने बाबांना सांगितली होती पण तिला माहित होते कि आई तिला कधीच जाऊ देणार नाही! बाबांचा मात्र तिला पूर्ण पाठिंबा होता. सगळी तयारी गपचूप करून मगच तिने आई ला सांगितले होते.

अनयाने आई ला पाणी आणून दिले. “हे घे. ओरडून ओरडून घसा दुखत असेल.”-अनया. आई ने रागाने अनाया कडे बघत पाणी प्यायले. “करा काय वाटेल ते. लग्नाचा विषय काढला तर म्हणे मी अजून लहान आहे, आणि एकटी उंडारायला फार मोठी झालीये आता.. ” म्हणत आई आत निघून गेली. बघता बघता अनया चा जायचा दिवस उजाडला. आई बाबा दोघेही तिला सोडायला एअरपोर्ट वर आले होते. त्यांना निरोप देऊन ती आत गेली. सगळ्या फॉर्मॅलिटीस करून वाट बघत बसली. थोड्या वेळाने बोर्डिंग सुरु झाले. अनया विमानात जाऊन बसली. ४ तासांनी फ्लाईट सिंगापुर ला आली. तिथे काही तासांचा हॉल्ट होता. तिथून तिच्या सर्वात अविस्मरणीय प्रवासाला सुरुवात झाली. ती प्रवासाचा प्रत्येक क्षण एन्जॉय करत होती. आणि शेवटी अनया हनोई ला पोहोचली! “येस्स, हे१५ दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस असणार आहेत.. माझी पहिली आणि कोण जाणे पण शेवटचीही सोलो ट्रिप!” उत्साहाने सगळे बघता बघता तिची नजर अचानक एका व्यक्तीवर खिळली. “कुठेतरी पाहिलंय ह्याला.. ” आणि क्षणात तिच्या डोक्यात प्रकाश पडला.. अरे हा तर प्रद्युम्न!
तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! प्रद्युम्न .. तिचा आवडता नट. अनया खूप मोठी टॉलिवूड फॅन होती. प्रद्युम्न तिचा सगळ्यात आवडता नट होता. तो दिसला काय, अन पटकन गाडीत बसून दिसेनासा झाला काय! “अरेरे, त्याचा ऍटोग्राफ हि घेतला नाही.. पण ट्रिप ची सुरुवात एकदमच जोरदार झालीये!” अनया ने स्वतः भोवती एक गिरकी घेतली!

अनया हि निघाली. तिने कोणतेही हॉटेल बुक केले नव्हते. ती होम स्टे घेणार होती. ती तिच्या ठरवलेल्या ठिकाणी पोहोचली. घरी खुशाली कळवली. ती एका अस्सल व्हिएतनामी कुटुंबासोबत राहात होती. तिची ट्रिप मजेत सुरु होती! दिवसभर भटकायचे, तिथली संस्कृती समजून घ्यायची, तिथले खास पदार्थ चाखून बघायचे, हेच सुरु होते! तिला रात्री जेवताना व्हिएतनामी कुटुंबाकडून तिथल्या एका धबधब्याबद्दल समजले. तिने ठरवले, कि उद्याच तिथे धाड मारायची! त्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला कि ती जागा खूप धोक्याची आहे. दाट जंगल, तिथे सगळे चुकतात म्हणून कोणीही एकटे जात आहे. शिवाय ते खूप आत आहे, खूप चालावे लागते. पण अनया ने ठरवले- जायचे म्हणजे जायचेच!

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ती कॅम्पिंग चे सामान घेऊन बाहेर पडली! तब्बल २ तास बस मध्ये, मग ३ तास चालल्यानंतर तिला तो धबधबा दिसला. सोबत काहीजण होते म्हणून तिला विशेष काही वाटले नाही. तिने पटकन तिचा कॅमेरा काढून फोटो काढायला सुरुवात केली. फोटो काढता काढता ती जंगलाच्या आतल्या भागापर्यंत कधी अली तिलाही कळले नाही. तोपर्यंत दुपार उलटून गेली होती. ती परत जायला निघाली पण सगळ्या पायवाटा सारख्ख्याच दिसू लागल्या! ती रस्ता चुकली होती! तरीही धीर एकवटून ती चालत राहिली पण धबधबा काही दिसेना .. मग मात्र ती रडकुंडीला आली.. आता अंधार पडू लागला होता.. सोबत काही कॅम्पिंग चे सामान होते, तिने त्यातून टॉर्च काढली आणि चालत राहिली. चालत चालत काहीतरी हालचाल जाणवली म्हणून तिने चमकून पहिले तर.. तिची भीतीने गाळणच उडाली.. शेजारच्या झाडावर गलेलठ्ठ अजगर वेढा मारून बसला होता.. अनया पळत सुटली.. पळता पळता ती एका खडकाला ठेचकाळून पडली. गुढगे, हात सोलून निघाले. आता मात्र अनया रडू लागली.. तशीच उठून ती चालत राहिली.. चालत चालत तिला पुढे एक नदी दिसली.. तिथे हात पाय तरी धुवावेत म्हणून ती झपाझप चालू लागली. आता चांगलेच अंधारून आले होते. रातकिड्यांचा आवाज वाढला होता. पाण्यापाशी जाऊन तिने हात पाय धुतले, आणि तिथेच बसून राहिली. अचानक तिच्या लक्षात आले कि रात्री पण जंगलातील प्राणी पाणवठ्यावर पाणी प्यायला येतात.ती अजूनच टरकली. तिथून उठली आणि चालायला लागली. थोडी पुढे गेल्यावर तिला कंदिलाचा उजेड दिसला. तिला हायसे वाटले. ती पळतच निघाली. पुढे जाऊन पहिले तर तिथे एक तंबू लावला होता.. ती मदतीसाठी हाक मारणार एवढ्यात आतून एक तरुण बाहेर आला.. हाक मारण्यासाठी उघडलेले तोंड उघडेच राहिले .. तो प्रद्युम्न होता!
इकडे प्रद्युम्न हि इतक्या संध्याकाळी अशी एकटी मुलगी जंगलात बघून आश्चर्यचकित झाला. त्याने तिच्याकडे निरखून पाहिले .. कळकटलेली जीन्स, कळकटलेला टी-शर्ट, पाठीवर कार्गो बॅग, ढोपरं फुटलेली, विस्कटलेले केस, आणि चेहऱ्यावर भीती, आनंद आणि आश्चर्य असे अनेक भाव. जीन्स लाही गुढग्यांपाशी चिखल लागला होता, म्हणजे हि नक्कीच धडपडलेली असणार-प्रद्युम्न च्या मनात आलं .. “Are you OK? Please sit here” म्हणत प्रद्युम्न ने तिला जवळच्याच दगडावर बसवले. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता कि तो प्रद्युम्न आहे. सकाळपासूनची धावपळ, जीवाची भीती, सगळं सगळं विसरली ती! “What are you doing here at this time? Does your group know that you are lost? There is no network here.. “-प्रद्युम्न. “I am on solo trip.” अनया इतकच म्हणाली. “Can I use this tent to change my clothes?”-अनया. “Sure”-प्रद्युम्न. अनया ने स्वतः चा अवतार बरा केला आणि कपडे बदलून बाहेर आली. जशी ती खाली बसली तशी तिच्या गुढग्यात कळ उमटली. “आई गं .. ” “सो यु आर मराठी हां”-प्रद्युम्न. “येस” अनया म्हणाली. “यु कॅन वेट हिअर टुनाईट”-प्रद्युम्न.

“चला रात्री थांबायची सोय झाली. काय नशीब आहे आपलं! लैच बेस्ट आहे आपली ट्रिप! कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून! माझा आवडता हिरो!!” अनया प्रद्युम्न कडे निरखून पाहू लागली.. ६ फूट उंची, मजबूत कमावलेलं शरीर, सावळा रंग, आणि ट्रिम केलेली बिअर्ड.. आणि खूप गोड हसू! “आईशप्पथ कसला हॉट आहे हा! शीट, मगाशी चक्कर यायचं नाटक करून गळ्यातच पडायला हवं होतं” स्वतःच्या ड्रॅमेबाजीवर अनया स्वतः च हसायला लागली, तास प्रद्युम्न तिच्याकडे “वेडीबिडी आहे कि काय” अशा विचित्र नजरेने पाहू लागला.. तसे आपल हसू आवरत घेत अनया ने मान वळवली आणि तारे बघत बसली. “देखो ना.. जरा देखो ना.. तुम हो में हू ओर ये तनहाइया है.. ” अनया गुणगुणू लागली..
खूप गोड गळा होता तिचा. भान हरपून ती गात राहिली.. गाणं झाल्यावर तिच्या लक्षात आलं कि प्रद्युम्न तिच्या शेजारी येऊन बसला आहे.. “यु सिंग व्हेरी वेल” – प्रद्युम्न. “थँक यु .. ” अवघडून अनया म्हणाली. “माय नेम इज .. “-प्रद्युम्न. “प्रद्युम्न .. आय नो. आय एम युअर बिग फॅन” – अनया म्हणाली. “मला माहीत नव्हतं कि माझे मराठीही फॅन आहेत!” – असा प्रद्युम्न म्हणताच अनया आश्चर्यचकित झाली. तिचा तो लहान मुलासारखा डोळे मोठे केलेला आणि आ केलेला चेहरा पाहून प्रद्युम्न हसू लागला. “मला मराठी येतं कारण माझी आई मराठी आहे.”-प्रद्युम्न. “ओह्ह .. मला आत्ता इतकं भारी वाटतंय ना.. असं वाटतंय चिमटा काढून बघावं कि मी स्वपनात तर नाही? म्हणजे मला असं जंगलात राहायलाच होत एकटीने, पण तेही तुझ्यासोबत? भगवान है यार, भगवान है!” अनयाच्या या कोटीवर प्रद्युम्न मनापासून हसला! त्याच्या गालांवर पडणारी खळी ती बघताच राहिली.. जस त्याने तिच्याकडे पाहिलं तशी तिने पटकन नजर चोरली.. इतक्यात जंगलात कोल्हेकुई ऐकू आली.. अचानक झालेल्या या आवाजाने अनया घाबरली आणि न कळतच प्रद्युम्न ला जाऊन बिलगली.. या प्रकाराने प्रद्युम्न नि बावरला पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.. अनया भानावर आली तशी पटकन बाजूला झाली..

“सॉरी.. ” – अनया. “इट्स ओके .. आणि कोणीतरी मगाशी खूप एकसाईटमेन्ट मध्ये होतं एकटीला जंगलात राहायला मिळालं म्हणून .. ” – प्रद्युम्न मिश्कीलपणे म्हणाला. प्रद्युम्न आणि तिने पाणी गरम करून नूडल्स करून खाल्ले. आता अनया ला खूप झोप येत होती.. पण झोपणार कुठे? ती तशीच पेंगत राहिली.. प्रद्युम्न मात्र दुर्बिणीतून तयार बघण्यात मग्न होता.. तारे बघून झाल्यावर त्याच्या लक्षात आले कि अनया तशीच एका खडकाला टेकून झोपून गेली आहे.. तो तिला उठवायला गेला.. “अरे, हिचं नावच नाही माहित, हिला कसं उठवायचं .. ” शेवटी त्याने तिचा खांदा हलवला पण अनया ला गाढ झोप लागली होती.. त्याने हलवल्यामुळे केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली.. प्रद्युम्न च्या मनात आले.. “किती शांत लहान मुलासारखी झोपली आहे.. निरागस.. हिच्याकडे बघून कोण म्हणेल कि एकटी अली आहे ट्रिप ला.. भलतंच रसायन दिसतंय हे..” खूप प्रयत्न केल्यावर शेवटी अनया ने डोळे किलकिले केले .. ती झोपेत होती म्हणून प्रद्युम्न ने तिला उठायला मदत केली आणि प्रद्युम्न ची आणि अनया ची नजरानजर झाली.. ते एकमेकांच्या इतके जवळ होते कि श्वास हि एकमेकांना ऐकू यावेत.. वेळ जणू थांबली तिथे.. सारी सृष्टी स्थब्ध झाली.. कितीतरी वेळ ते तशाच अवस्थेत उभे होते.. इतक्यात गार वाऱ्याची झुळूक आली , आणि अनया चे केस तिच्या चेहऱ्यावर आले.. ती पटकन ते मागे घेणार इतक्यात प्रद्युम्न ने हाताने तिच्या केसांची बट मागे सरकवली..

अनया गोरीमोरी झाली.. पटकन स्वतः ला सोडवून ती बाजूला झाली.. “तू आत झोपलीस तरी चालेल .. “-प्रद्युम्न. “नाही, हा तुझा टेन्ट आहे, मी आत आणि तू बाहेर असं कसं?”-अनया. “मी बाहेर असं कोण म्हणालं? दोघेही आतच झोपूया.. “-प्रद्युम्न. अनया ला ओशाळल्यासारखे झाले.. “सॉरी मला वाटलं तू.. पण असं .. ” – अनया. तिला असं विचारात पडलेल पाहून प्रद्युम्न म्हणाला, “हे बघ इट इज नॉट सेफ आउटसाइड .. इट्स फाईन.” अनया लाही ते पटलं आणि ती गपचूप आत जाऊन झोपली. प्रद्युम्न हि आत जाऊन झोपला. अनया त्याच्याकडे पाठ करून झोपली. जरी डोळे मिटले होते तरी तिच्या डोळ्यांसमोरून प्रद्युम्न जात नव्हता.. त्याचा तो स्पर्श, त्याच तिला मदत करणं .. त्याची खळी .. त्याचं चेहऱ्यावरची बट बाजूला सरकावणं .. अनया च्या मनात जणू उकळ्या फुटल्या होत्या! त्या आनंदातच ती झोपी गेली, येणारी सकाळ अजून काय घेऊन येणार आहे हा विचार करतच!

क्रमशः

Image by Pete Linforth from Pixabay 
Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

One thought on “सोलो_ट्रिप – भाग १ – पूजा पाठक

  • March 25, 2020 at 5:34 am
    Permalink

    Mast Ch … welcome mam

    Reply

Leave a Reply to Shreya Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!